Skip to content Skip to footer

पश्चिम बंगाल : भाजपा युवा मोर्चाच्या महिला नेत्याकडे सापडले अमली पदार्थ

 

सध्या पश्चिम बंगालमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाच्या युवा महिला नेत्याला पोलिसांनी अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी भाजपाच्या माहिला नेत्याकडे १०० ग्राम कोकीन सापडले आहे तसेच तिला अटक सुद्धा करण्यात आली आहे.

भाजपाच्या या महिला नेत्याचे नाव ‘पामेला गोस्वामी’ असे आहे. पामेला गोस्वामीसोबत तिचा सहकारी प्रबीर डे यालाही अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पामेला गोस्वामी कोकीन घेऊन आपल्या कारमधून जात असतानाच पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी तिला कोकीन पुरवणाऱ्या प्रबीर डे यालाही अटक केली आहे.

प्रबीरला कोलकात्यामधील अलीपुर येथील एनआर अ‍ॅव्हेन्यू येथून अटक करण्यात आली आहे. पामेलाला अटक करण्यात आली तेव्हा तिच्यासोबत कारमध्ये तिचा एक सुरक्षारक्षकही होता. तिच्या अटकेमुळे पश्चिम बंगालमध्ये एकचं खळबळ उडाली आहे.

Leave a comment

0.0/5