Skip to content Skip to footer

ज्या क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग आहे तिथे कंटेनमेंट झोन तयार करून चाचण्या वाढवा – दीपक म्हैसकर

 

” राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यात अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आढळून येत असेल तेथे कंटेनमेंट झोन करून चाचण्या वाढवा” असे आदेश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले.

“नागरिकांनी मास्क लावणे, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझिंग या कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोर पालन होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा” असे ही निर्देश म्हैसकर यांनी दिले आहे. सध्या वाढत असलेली रुग्णसंख्या सरकारची चिंता अधिक वाढवणारी आहे. त्यामुळे राज्य सरकार कठोर पाऊले उचलत आहे.

अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यांत वाढलेली कोरोना रुग्णसंख्या, आरोग्य व महसूल विभागाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले नियोजन व उपाययोजना या संदर्भात म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेतला. ज्या परिसरात अधिक रुग्ण संख्या आढळून येत आहे,” त्याठिकाणी चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. कटेंनमेंट झोनसह जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठी दंडात्मक कारवाई करावी” असे आदेश दिले आहे

Leave a comment

0.0/5