Skip to content Skip to footer

इंस्टग्राम स्टार समीर गायकवाड यांची राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या नंतर आणखी एका टिकटॉक स्टारने पुण्यात राहत्या घरी साडीच्या साहाय्याने पंख्याला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव समीर गायकवाड असून समीरचे सोशल मीडियावर लाखो फॅन आहेत.

वाघोली येथील केसनंद रोडवरील निकास सोसायटीमधील आपल्या राहत्या घरात समीर गायकवाडने गळफास घेतला. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती लोणीकंद पोलीस स्थानकाला समीरचा भाऊ प्रफुल्ल गायकवाडने कळवली आहे. समीरला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते मात्र तेथे त्याला मृतघोषित करण्यात आले.

समीरने आत्महत्या का केली यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. कोणतीही सुसाईड नोट समीरच्या रुममध्ये किंवा खिशामध्ये मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आता समीरच्या भावाची आणि जवळच्या नातेवाईकांची या प्रकरणामध्ये पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच समीरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले यासंदर्भातील काही माहिती समोर येऊ शकेल.

Leave a comment

0.0/5