Skip to content Skip to footer

महापौर किशोरीताई पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणार्याने गल्लीच भाषेत शिवीगाळ सुद्धा केली आहे. २२ डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिली गेली होती.

३१ डिसेंबर २०२० रोजी आजाद मैदान पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलीस पुढील तपास करत आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून किशोरी पेडणेकर सातत्याने भारतीय जनता पक्षावर टीका करत होत्या.

तसेच ईडीच्या चौकशीवरूनही त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. ”ईडी ही आपल्या देशाची महत्त्वाची संस्था आहे. जे काही सत्य आहे ते पारदर्शकपणे जनतेसमोर येईल. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे जनतेचे देखील मत आहे. यामुळे विरोधकांना आयते कोलीत हातात मिळाले आहे. परंतु निश्चितपणे जे सत्य आहे ते बाहेर येईल अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीला दिली होती.

Leave a comment

0.0/5