Skip to content Skip to footer

शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम सुरु ठेवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध विषयावर जनतेशी संवाद साधत पुन्हा एकदा ‘वर्क फ्रॉम होम’ची संकल्पना त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी सुचवली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात कार्यालये सुरु झाल्यामुळे पुन्हा एकदा गर्दी वाढून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, संपर्क टाळण्यासाठी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही त्यांना वर्क फ्रॉम होम ही सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री रविवारी आपल्या संवादात आग्रही दिसले होते.

तसेच कर्मचाऱ्यांच्या तुकड्या करत ऑफिसमधील विभागांमध्ये ही सुविधा सोयीनुसार देण्याचा सल्ला त्यांनी दिला. सोबतच रेल्वे, खाण्याची ठिकाणं आणि इतरही काही ठिकाणांवर कारण नसताना होणारी गर्दी टाळण्याचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचलून धरला होता.

Leave a comment

0.0/5