Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी घेतलेल्या योजनांची माहिती देणाऱ्या ‘शिव दिनदर्शिका’चे प्रकाशन

 

राज्यात शिवसेनेने आपल्या जुन्या मित्रपक्षाला दूर सारून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाबरोबर महाविकास आघाडी स्थापन करून महाराष्ट्रात आघाडीचे सरकार स्थापन केले होते. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील जनतेच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते.

जनतेसाठी योजनांबाबत /धोरणांबाबत जे निर्णय घेण्यात आले होते त्यातील काही महत्वपूर्ण निर्णयांचे संकलन करून प्रविण शिंदे (संपर्कप्रमुख, पाटण विधानसभा) यांच्या संकल्पनेतून शिव दिनदर्शिकाची निमिर्ती करण्यात आली आहे.

या दिनदर्शिका’चे शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांच्या हस्ते ‘शिवसेना भवन’ येथे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. या सर्व निर्णयांची एकत्रितपणे माहिती सामान्य नागरिकांना शिव दिनदर्शिकाच्या माध्यमातून होणार आहे, असे दिवाकर रावते यांनी म्हटले.

Leave a comment

0.0/5