Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘लॉकडाऊन’ संबंधित आठ दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर बोलावली महत्वाची बैठक

 

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात कोरोनाने पाय पसरल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात येईल का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत सांगितले होते की, कोरोनासंबंधित सर्व नियमांचे पालन जनता करते की नाही, हे पाहून पुढील आठ ते दहा दिवसात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आता मंगळवारी म्हणजेच आज मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. या बैठकीत मुंबईमध्ये असणाऱ्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे समजले आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नवीन रुग्णांची संख्या ही हजारापर्यंत पोहोचली आहे. याकरिता पालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी सोमवारी रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. यामध्ये पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता. यावेळी सूचना देण्यात आल्या की ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत त्यांना रुग्णालयात दाखल करून घेऊ नये. तसेच संक्रमित रुग्ण आणि उपलब्ध खाटा यांबाबत माहिती देणारे डॅशबोर्ड आणि फलक हे वेळोवेळी अद्ययावत केले जावे अशा सूचना देखील देण्यात आल्या.

Leave a comment

0.0/5