Skip to content Skip to footer

एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप अकाऊंट उघडणं शक्य आहे?

व्हॉट्सअॅप हे अॅप्लिकेशन आपल्याकडे भलतंच लोकप्रिय आहे. पण, व्हॉट्सअॅपचा फायदा असला तरी कधी कधी व्हॉट्सअॅप वापरण्याचा कंटाळा येतो. कारण व्हॉट्सअॅपवर ऑफिसचे किंवा शाळा, कॉलेज अशा अनेक ग्रुपवरून सारखे मेसेजेस येत असतात. अशावेळी खासगी क्रमांकासाठी वेगळं अकाऊंट असतं तर..?, असा विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात आला असेलच. एकावेळी फोनमध्ये दोन भिन्न अकाऊंट सुरू करणं शक्य नसलं तरी हल्ली काही फोनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. या सुविधेचा वापर करून तुम्ही एकाचवेळी दोन व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरू शकता. ते कसं करायचं याची माहिती पुढीलप्रमाणे

https://maharashtrabulletin.com/whatsapp-rollsout-colorful-text-status/

– शिओमीच्या हँडसेटमध्ये हे शक्य आहे. शिओमीच्या हँडसेटमध्ये ‘ड्युअल अॅप सपोर्ट’ हे फीचर आहे. सेटिंगमध्ये ‘अॅप सेटिंग’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ड्युअल अॅप हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की तुम्ही तुमच्या शिओमीच्या हँडसेटमध्ये एकाच वेळी दोन व्हॉट्स अॅप अकाऊंट सुरू करु शकता.
– शिओमीबरोबर सॅमसंग जे, लिनोव्ह p2 यासारख्या हँडसेटमध्ये हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्याकडे या कंपनीचे हँडसेट असतील तर तुम्ही एकाच वेळी दोन व्हॉट्स अॅप अकाऊंट सुरू करु शकता
– या व्यतिरिक्त तुम्ही ‘Parallel Space app’ हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन एकाचवेळी दोन व्हॉट्स अॅप वापरू शकता. प्ले स्टोअरमधून तुम्ही हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

अधिक माहिती

Leave a comment

0.0/5