Skip to content Skip to footer

सांगली मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपाला जोरदार धक्का महापौरपदी राष्ट्रवादीचे सूर्यवंशी विराजमान

सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संपली होती. मात्र आता राष्ट्र्वादीने भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का देत राष्ट्रवादीचा महापौर विराजमान झाला आहे.

सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली. ही निवड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा अवघ्या ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले होते.

चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. त्यात भाजपाचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपाला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली होती. मात्र अखेर बहुमत असून सुद्धा भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Leave a comment

0.0/5