Skip to content Skip to footer

शिवसेना नेते संजय राठोड यांची पोहरादेवीच्या दर्शनासाठी येण्याची वेळ ठरली

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड आज सहकुटुंब पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणार आहे. आज सकाळी ११:०० ते १२:०० च्या सुमारास ते पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राठोड यांच्याकडून यावेळी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. पोहरादेवी येथे संजय राठोड बंजारा समाजाला उद्देशून भाषण करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी जवळपास १५ ते २० हजार लोक जमतील, अशी माहिती पोहरादेवी संस्थानचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे.

महंत जितेंद्र महाराज यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना या संदर्भातील माहिती दिलेली आहे. संजय राठोड हे आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत, असे सांगितले. आतादेखील पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यामुळे संजय राठोड आज पोहरादेवीच्या दर्शनाला येणार आहेत. आम्ही लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच मंदिराच्या आवारात एक छोटे स्टेज उभारण्यात आले आहे. या स्टेजवरून संजय राठोड बंजारा समाजाला उद्देशून भाषण करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हा स्टेज त्यांच्यासाठी उभारण्यात आलेला नाही अशी माहिती महंतांनी प्रसार माध्यमांना दिलेली आहे.

Leave a comment

0.0/5