Skip to content Skip to footer

भाजपा नेते धनंजय महाडिकांसह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालणारी आहे. त्यात कोरोना संसर्गाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लग्नसोहळ्यासाठी काही नियमावली ठरवून दिलेली आहे.

मात्र कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजपा नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नाला कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवून मोठ्या संख्येने लोक विवाहाला उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले होते. तसेच या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु झाल्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे. माजी खासदार महाडिक यांच्यासह तिघांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या लग्नसोहळ्याला हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. या सोहळ्याला अनेक नेत्यांनीही हजेरी लावली होती. मात्र, समारंभादरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात आले नव्हते. तसेच एक हजाराहून अधिक लोक लग्न संभारंभाला उपस्थित राहिले होते अशी माहिती हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली आहे. त्यामुळे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5