Skip to content Skip to footer

शिवसेना नेते संजय राठोड यांचे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी स्पष्टीकरण

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. तसेच विरोधकांकडून राठोड यांना जबाबदार धरण्यात आले होते. यावर आता संजय राठोड यांनी आज पोहरादेवीच्या दर्शनानंतर पहिली प्रतिक्रिया देत सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूचे बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. याचं आम्हाला दु:ख आहे तसेच आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. तिच्या मृत्यूवरुन विरोधक घाणेरडं राजकारण करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणाची चौकशी लावली आहे. मात्र या प्रकरणात माझीही बदनामी केली जात आहे.

मी भटक्या विमुक्त समाजातून, ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता मी मागासवर्गीय, ओबीसीचं नेतृत्व करणारा नेता आहे. माझ्या राजकीय जीवनाला उद्धवस्त करण्यासाठीचं षडयंत्र केले गेले. या कुठल्याच गोष्टीत तथ्य नाही.

पुढे बोलताना राठोड म्हणाले की, सर्वांना माझी विनंती आहे की, माझी, कुटुंबाची आणि माझ्या समाजाची बदनामी करु नका. माझी पत्नी आहे, आई वडील आहे, मुलं बाळं आहेत, त्यांना सावरत होतो. माझ्या पत्नीला रक्तदाबाचा त्रास, मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणं काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा असे त्यांनी बोलून दाखवले होते.

Leave a comment

0.0/5