Skip to content Skip to footer

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेळेत होणार बदल

राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार आणि मनपाची डोकेदुखी वाढवत आहे. त्यात आता पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेळेत सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातील आदेश पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिला आहेत.

सकाळी ९ ते सायंकाळी ४ या कालावधीत गट अ व गट ब वर्गातील अधिकारी १०० टक्के तर गट क व गट ड उपस्थित ५० % राहतील. २५ टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील, तर ११ ते ५ या कालावधीत २५ टक्के कर्मचारी कार्यालयात असतील.

तर उर्वरीत क व ड चे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील, पण ज्यावेळी तातडीची आवश्यकता असेल, त्यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू शकतात. जे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत ते फोनवर उपलब्ध असणार आहे. तसेच गरजेनुसार कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात येतील.

Leave a comment

0.0/5