Skip to content Skip to footer

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकामागे ‘या’ दहशतवादी संघटनेचा हात ?

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ घराजवळ स्फोटकाने भरलेली गाडी आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राखाडी रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या तब्बल २० कांड्या सापडल्या होत्या. तसेच एक धमकीचे पत्रही या गाडीमधून मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यातच आता या कृत्यामागे इंडियन मुजाहिद्दीन या दशहतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. क्राइम ब्रांचने या घटनेचा संपूर्ण तपास हाती घेतला आहे. तसेच १० पथके तयार करण्यात आली असून एक टीम परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासणार आहेत. तर दुसरी टीम वाहतूक मुख्यालयाती कॅमेरांमधील फुटेज तपासणार आहे. इतरही टीम या घटनेच्या संदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

तसेच इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित एका सदस्याची माहिती मिळवण्याची जबाबदारीदेखील एका टीमवर सोपण्यात आली आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या या सदस्याने २०१३ मध्ये मुकेश अंबानीं यांच्या मरिन ड्राइव्हमधील कार्यालयात धमकी देणारे एक पत्र पाठवले होते. त्याच आधारे वेगवेगळ्या ठिकाणी पथके चौकशी करत आहे.

Leave a comment

0.0/5