Skip to content Skip to footer

पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही, संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला

इंधन दरवाढ मुद्द्यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ तुम्हाला धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका, तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढ रामाच्या राज्यात शोभत नाही असा टोला सुद्धा केंद्रात बसलेल्या भाजपाला लगावला होता.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सत्ताही भाजपा पक्षाला श्रीरामाच्या नावावर म्हणजे धर्माच्या नावावर मिळाली आहे. राजकारणात धर्माला जास्त महत्त्व दिले जात आहे, असे सांगतानाच लोकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पेट्रोल- डिझेल दरवाढ करणे. या दरवाढीसंदर्भातील धर्मसंकट तत्कालीन यूपीए (काँग्रेस) सरकारवरही होते. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी संकटाचा सामना करायचे.

देशातील जनतेचे महागाईपासून रक्षण करणे हे देशात असलेल्या सरकारचं काम आहे. व्यापारात फायदा होतो की तोटा हे बघायला सरकार बसलेलं नाही. आपण रामराज्यात राहतो. पण बाजूला असलेल्या सीता आणि रावण यांचा जन्म झालेल्या देशात म्हणजे नेपाळ आणि श्रीलंकेत पेट्रोल डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही असा टोला सुद्धा त्यांनी लगावला होता.

Leave a comment

0.0/5