Skip to content Skip to footer

IAS आपल्या भेटीला या उपक्रमातून प्रशासकीय अधिकारी घडतील – उदय सामंत

IAS आपल्या भेटीला’ या उपक्रमातुन उद्याचे प्रशासकीय अधिकारी घडण्यास मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या एकत्रित विघमाने सर्व महाविदयालयांमध्ये “करियर कट्टा” हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते.

या उपक्रमांच्या माध्यमातून ‘IAS आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला’ तसेच ‘आवाज गुरुजनांचा वेध देशाच्या भवितव्याचा’ या अभिनव उपक्रमांचा ऑनलाइन शुभारंभ सोहळा पार पडला होता.

यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी या उपक्रमासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अभियांत्रिकीचे शिक्षण इंग्रजीसोबतच मराठी भाषेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयोग तंत्र शिक्षण विभाग करत आहे. तसेच देशाच्या राजधानीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या व मुलाखतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याबद्दल लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं सुद्धा बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5