Skip to content Skip to footer

कोरोनाची लस टोचून घेण्यास काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा नकार

सध्या संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यातच आज पासून वरिष्ठ नागरिकांना सुद्धा कोरोनाची लस टोचण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली आहे. मात्र काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लस टोचून घेण्यास नकार दिला आहे.

‘कोरोना लस कधी घेणार?’ या प्रश्नावर उत्तर देताना खर्गे यांनी सांगितले की, माझं वय आता ७० वर्ष झाले आहे. कोरोना लस तरुणांना द्यायला हवी. त्यांच्याकडे मोठं आयुष्य आहे. माझ्याकडे तर आता १० ते १५ वर्षच आयुष्य उरलं आहे. त्यापेक्षा तरुणांना प्रथम लस देण्यात यावी अशी मागणी त्यांनीं केली आहे.

Leave a comment

0.0/5