Skip to content Skip to footer

राज्यपालांनी १२ आमदार ठेवलेत मांडी खाली दाबून, संजय राऊतांचा टोला

मुंबई : राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले होते. त्यात याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात शाब्दिक वाद झालेले पाहायला मिळाले होते. सोमवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्यांच दिवशी पुन्हा एकदा राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक युद्द झालेले पाहायला मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले की, ‘राज्यपालांनी मांडी खाली १२ आमदार दाबून ठेवले आहेत, ते मोकळे करावे. राऊत म्हणाले की,आमचे राज्यपाल करुणेचे सागर आहेत. महाराष्ट्र हा देवांचा, संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम महाराष्ट्रातून झाला आहे. म्हणून बहुतेक राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्र रमावसं वाटतं आहे. त्याच करुणेच्या भावनेनं त्यांना कायद्यावर आणि घटनेवर करुणा दाखवावी.

आज १२ राज्यपालनियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडी खाली दाबून ठेवले आहेत, ते मोकळे करावे. म्हणजे राज्यपालाच्या मनात घटनेविषयी करुणा आहे, हे देशाला समजेल. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्म्याला देखील शांतता लागेल,’ असे संजय राऊत म्हणाले.

Leave a comment

0.0/5