Skip to content Skip to footer

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला ‘लॉकडाऊन’चा इशारा

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, काही भागात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय दोन-तीन दिवसात घेतला जाऊ शकतो. राज्यात बुधवारी कोरोना विषाणू संसर्गाची या वर्षातील सर्वाधिक १३,६५९ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या २२,५२,०५७ वर पोहोचली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली असून ते पुढे म्हणाले की, आणखी ५४ रुग्णांच्या निधनानंतर मृतांची एकूण संख्या वाढून ५२६१० झाली आहे. त्यानंतरच आता असे म्हटले जात आहे की लॉकडाऊनच्या निर्णयाला स्थगिती देणारे उद्धव ठाकरे सरकार आता लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ शकते.

दरम्यान औरंगाबादमध्ये रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लिमिटेड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यासह शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे. प्राप्त माहितीनुसार ४ एप्रिलपर्यंत हे मर्यादित लॉकडाऊन असेल. यावेळी केवळ आवश्यक सेवा सुरू राहतील. दुसरीकडे, नागपुरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे, फक्त आवश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले की, “विनाकारण बाहेर जाणे टाळा, मास्क वापरा, हात धुवा, सुरक्षित अंतर पाळा, सर्वांनी लसीकरण करून घ्या, कारण काही दिवसांनी बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन केले जाऊ शकते.” असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, “अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, पण ती जाऊ नये असं जर वाटत असेल तर बंधनं पाळणं गरजेचं आहे.”

Leave a comment

0.0/5