Skip to content Skip to footer

अकोला जिल्ह्यात आज रात्रीपासून ‘लॉकडाऊन’, सर्वकाही असेल बंद, जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात वेगाने वाढणार्‍या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात आज रात्रीपासून लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री ८ वाजेपासून ते १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्यात वाढत असलेल्या कोरोना साथीमुळे राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तातडीच्या सेवा पुरविणाऱ्या वाहनांना फक्त पेट्रोल व डिझेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोना नियंत्रित करण्यासाठी कठोर नियम लादले जात आहेत. पुण्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, तर नागपुरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच औरंगाबाद, पालघर, ठाणे, अकोला, अमरावती येथील जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना प्रकरण लक्षात घेता नियम लागू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5