Skip to content Skip to footer

राज्यात पुन्हा नव्याने कोविड निर्बंध लागू

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याकारणाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्याची वेळ सरकारवर आली आहे. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करा अथवा लॉकडाऊन लागू करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधीच दिला होता. मात्र सरकारने सरसकट लॉकडाऊन न लावता कठोर निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.

या दरम्यान हॉटेल्स, रेस्टारंट केवळ ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार आहेत. मॉल्समध्ये देखील सॅनिटायझर, मास्क यांचा वापर अनिवार्य करण्यात आला असून सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच सभा, समारंभांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.

तसेच कार्यालयीन उपस्थिती केवळ ५० टक्केच करण्यात आली आहे. लग्न समारंभाला ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच धार्मिक स्थळांवर प्रत्येक तासाला ठराविक जणांनाच परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये मात्र रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे, कारण रेल्वेप्रवासावर अद्याप तरी निर्बंध लागू करण्यात आलेले नाही.

Leave a comment

0.0/5