India vs England Match Preview: रोहित शर्माची होणार वापसी, केएल राहुलचा पत्ता कट!

महाराष्ट्र बुलेटिन : दुसर्‍या सामन्यात दणदणीत विजयानंतर आत्मविश्वास वाढलेला भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या टी-२० सामन्यात अतुलनीय प्रदर्शन करण्यास सज्ज आहे. टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात आठ विकेट्सने पराभूत झालेल्या भारताने दुसर्‍या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दुसर्‍या सामन्यात विराट कोहली आणि त्याची टीम प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करण्यात यशस्वी झाली. इशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत ३२ चेंडूत ५६ धावा करून निर्णायक फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

पहिल्याच षटकात केएल राहुल बाद झाला, तरीही किसनने विचलित न होता जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लावत भारतीय संघाचा दृष्टीकोन व्यक्त केला. याखेरीज अखेरच्या पाच डावांपैकी तीन डावात खातेही उघडू न शकलेल्या कर्णधार कोहलीचा फॉर्म परत आल्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला. इंग्लंडला १६४ धावांवर रोखून गोलंदाजांनी आपले काम उत्तम पार पाडले. हार्दिक पांड्याने बर्‍याच दिवसानंतर चार ओव्हरची गोलंदाजी केली आणि यामुळे भारताला अतिरिक्त फलंदाजांसह मैदानात उतरता आले. फलंदाजीच्या क्रमवारीत श्रेयस अय्यरच्या वर चौथ्या क्रमांकावर पाठविलेल्या ऋषभ पंतकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पंतने दोन्ही डावांमध्ये चांगली सुरूवात केली, परंतु त्या खेळीस मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतरित करता आले नाही.

रोहित शर्माची होईल संघात वापसी

भारतीय संघ विजयी इलेव्हनमध्ये बदल करण्यास पसंती देणार नाही. तथापि, सलामीवीर रोहित शर्मा दोन सामन्यात विश्रांती घेतल्यानंतर माघारी परतण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलला जागा बनवावी लागेल जो दोन्ही डावात अपयशी ठरला. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी योग्य संयोजन शोधण्याचे भारताचे लक्ष्य आहे. दुसरीकडे दुखापतीमुळे हा सामना न खेळू शकणाऱ्या मार्क वूडच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा हल्ला प्रभावी ठरला नाही. कर्णधार ऑयन मॉर्गनने मात्र पुढील सामना तो खेळणार असल्याचे सांगितले. सलामीवीर जेसन रॉय दोन्ही डावांमध्ये फॉर्मात होता परंतु अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. पुढच्या सामन्यात तो आणखी चांगली कामगिरी करू शकतो.

संघ खालीलप्रमाणे आहेत:

भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चहर, राहुल तेवतिया, इशान किशन (राखीव यष्टीरक्षक).

इंग्लंड: ऑयन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मालन, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, ख्रिस जॉर्डन, मार्क वूड, सॅम कुर्रेन, टॉम कुर्रेन, सॅम बिलिंग्ज आणि जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here