Skip to content Skip to footer

धक्कादायक: दिल्लीत भाजपा खासदार ‘राम स्वरूप शर्मा’ यांची गळफास घेऊन ‘आत्महत्या’

महाराष्ट्र बुलेटिन : राजधानी दिल्लीत एका खासदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईमध्ये आत्महत्या केली होती. ते प्रकरण ताजे असताना अजून एका भाजपा खासदाराने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे खासदार राम स्वरूप शर्मा यांनी दिल्लीतील त्यांच्या खासदार निवासात गळफास घेत जीवन संपवले असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

राम स्वरूप शर्मा हे हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. त्यांचं निवासस्थान दिल्लीच्या आरएलएम रुग्णालयाजवळ असून या निवासस्थानी ६२ वर्षीय राम स्वरूप शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला आहे.

घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांच्याच निवासस्थानातील कर्मचाऱ्याने दिल्ली पोलिसांना दिली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. शर्मा यांनी आत्महत्या का केली, याचा तपास केला जात आहे. कर्मचाऱ्याने सांगितले की, “जेव्हा मी शर्मा यांच्या रूमचा दरवाजा उघडायला गेलो, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. वारंवार आवाज देऊनही काहीच प्रतिसाद न आल्याने पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल आले आणि त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.”

Leave a comment

0.0/5