Skip to content Skip to footer

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृह सुरु करण्याचा विचार ! – मुख्यमंत्री

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृह सुरु करण्याचा विचार ! – मुख्यमंत्री

राज्यातील सिनेमागृह कधी सुरु होणार यावर आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज्यातील सिनेमागृह सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत आदर्श कार्यपद्धती तयार केली आहे. आदर्श कार्यपद्धती निश्चित झाल्यावरच राज्यातील सिनेगृह सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्व चित्रपट गृह बंद आहेत. याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी संवाद साधला होता.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सिनेमागृहांबाबतही सकारत्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीनुसार सिनेमागृहे सुरु करण्यात येतील. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. मनोरंजन क्षेत्र हे राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे क्षेत्र आहे. हे क्षेत्र बंद ठेवण्यात आपल्याला किंवा शासनाला आनंद नाही.

सिनेमागृहांमध्ये वातानुकुलित वातावरणात प्रेक्षक सिनेमा पहायला आल्यानंतर किमान दोन तास बंदिस्त ठिकाणी असतो त्यावेळी त्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील स्वच्छता पाळली जाणे, सिनेमागृहे वेळोवेळी सॅनिटाईज करणे, सिनेमागृहात एकूण आसनक्षमतेच्या फक्त ५० टक्के प्रेक्षक असणे याबाबी पाळल्या जाणे गरजेचे आहे. एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, प्रेक्षकांनी मास्क लावणे, सॅनिटाईज करणे आणि शारीरिक अंतर पाळणे हे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Leave a comment

0.0/5