Skip to content Skip to footer

पाकिस्तानी दिग्गजांनी देखील ‘प्रसिद्ध कृष्णा’ला केला सलाम, शोएब अख्तर म्हणाला- ‘ये गेंदबाज करिश्मा है’

महाराष्ट्र बुलेटिन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला ६६ धावांनी विजय मिळाला. जगातील पहिल्या क्रमांकाच्या संघाचा पराभव करण्यात भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. परंतु गोलंदाजीच्या बाबतीत बघितले तर पहिला सामना खेळणार्‍या प्रसिद्ध कृष्णाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने ४ फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. प्रसिद्ध कृष्णा त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये खूपच महाग असल्याचे सिद्ध झाले परंतु दुसर्‍या स्पेलमध्ये या खेळाडूने जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्ज आणि टॉम करन यांच्या विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा हा भारताकडून पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात चार बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीने प्रत्येकाला भुरळ घातली आहे आणि आता त्याचे चाहते पाकिस्तानात देखील आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने तर प्रसिद्ध कृष्णाची प्रशंसा करताना त्याला ‘करिश्मा’ असल्याचे संबोधले आहे.

शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चैनलवर सांगितले की, ‘पहिल्या स्पेलमध्ये कृष्णाने मार खाल्ला आणि त्यानंतर त्याने चार विकेट झटकल्या, माझ्या मते तो कृष्णा नाही तर करिश्मा आहे.’ शोएब अख्तरसह बसलेल्या क्रिकेट एक्सपर्टने सांगितले की भारतीय टीम या वेळी तिन्ही फॉर्मेटमध्ये बेस्ट टीम आहे. खासकरून त्यांची बेंच स्ट्रेंथ तर कमाल आहे. ज्या प्रकारे कृष्णाने फलंदाजांकडून मार खाल्ल्यानंतर देखील वापसी केली आणि चार बळी घेतले, यातून टीम इंडियाची ताकद दिसून येते.

टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहित-विराट करू शकतात ओपनिंग

शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनलवरच माजी क्रिकेटर राशिद लतीफने सांगितले की इंडियाला रोहित आणि विराटच्या रूपात नवीन टी-२० सलामीची जोडी मिळाली आहे. लतीफने सांगितले की विराट कोहली आयपीएलमध्ये सलामीला आला तर टी-२० वर्ल्ड कपमध्येही याच भूमिकेत दिसू शकेल. सोबतच राशिद लतीफने वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरचे देखील कौतुक केले. लतीफच्या म्हणण्यानुसार, ठाकूरला खेळपट्टीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे चांगल्यापैकी माहित आहे.

Leave a comment

0.0/5