Skip to content Skip to footer

नाशिक जिल्ह्याच्या न्यायालयीन इमारतीला लागली भीषण आग

महाराष्ट्र्र बुलेटिन : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मागील बाजूच्या इमारतीला गुरुवारी म्हणजेच आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले आणि न्यायालयाच्या परिसरात सगळीकडे धुराचे साम्राज्य पसरले. दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.

गुरुवारी दुपारी न्यायालयाच्या आवारामध्ये न्यायाधीश, वकील व पक्षकार असतानाच इमारतीमध्ये ही आग भडकली. आग लागल्याचे समजताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक यंत्राच्या साहाय्याने आग विझविण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र आगीने अवघ्या काही क्षणामध्येच रौद्ररूप धारण केल्याने आगीला आटोक्यात आणता आले नाही.

इमारतीमधील कागदपत्रे आगीच्या भक्षस्थानी पडले असून, मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे. दरम्यान अग्नीशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a comment

0.0/5