Skip to content Skip to footer

महिलेचा दावा- कोविशील्ड लस घेतल्यानंतर ९ वर्षानंतर परत आली डोळ्यांची दृष्टी

महाराष्ट्र्र बुलेटिन : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये वयोवृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणात लसी दिल्या जात आहेत. दरम्यान, राज्यातील जालना जिल्ह्यात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने एक आगळावेगळा दावा केला आहे. त्या महिलेने म्हटले की नऊ वर्षांपूर्वी तिला दिसणे बंद झाले होते. पण आता कोरोना विषाणूची लस मिळाल्यानंतर तिला पुन्हा दिसू लागले आहे. त्या महिलेच्या मते, तिने कोविशील्ड ही लस घेतली होती.

मथुराबाई बिडवे नामक ही ७० वर्षीय महिला राज्याच्या जालना जिल्ह्यातील परतूर गावातील रहिवासी आहे. ती सध्या वाशिममधील रिसोड येथे वास्तव्य करते. सदर महिलेने सांगितले की ९ वर्षांपूर्वी मोतीबिंदूमुळे तिच्या डोळ्यांची दृष्टी गेली. आजारपणामुळे तिच्या डोळ्यांची पुतळी सफेद पडली होती आणि त्यानंतर दिसणे बंद झाले होते.

माध्यमांच्या वृत्तानुसार, २६ जून रोजी मथुराबाईंना कोविशील्ड लसीचा पहिला डोस मिळाला होता. त्यांचा असा दावा आहे की दुसर्‍याच दिवशी त्यांची दृष्टी परत आली आणि ३० ते ४० टक्के त्यांना दिसू लागले.

तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लसीमुळे त्यांची दृष्टी परत येण्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. याआधीही राज्यातील एका व्यक्तीने जूनमध्ये असा दावा केला होता की कोरोना लस घेतल्यानंतर त्याच्या शरीरात चुंबकीय शक्ती आली होती. ७१ वर्षीय अरविंद सोनार यांनी त्याचा एक व्हिडिओ देखील बनविला होता. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तथापि, वैज्ञानिक पातळीवर हे देखील चुकीचे असल्याचे सांगण्यात आले होते.

Leave a comment

0.0/5