Skip to content Skip to footer

जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी सुरु केलेल्या ‘शिवसंपर्क अभियान’ दौऱ्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यभरात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभुमीवर पुणे जिल्ह्यात माजी खासदार तथा शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर कटके यांनी देखील या अभियानाचे आयोजन केले आहे.

जनतेच्या मनातील शिवसेने विषयीचा विश्वास हेच आपले स्वबळ आहे आणि ते वाढवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना केल्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियान दौऱ्याला जोमाने सुरुवात झाली आहे. जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके यांनी गावागावात शिवसंपर्क अभियाना दौऱ्याला सुरुवात केली असून युवा कार्यकर्त्यांकडून या अभियानास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे.

या शिवसंपर्क अभियानासंदर्भात कटके यांनी सांगितले की, पंचायत समिती क्षेत्रात जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख व तालुका प्रमुखांसह दौरा करून स्थानिक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना संघटक यांची बैठक घेतली जात आहे,. गावागावांतील प्रभागनिहाय शिवसैनिक, शाखाप्रमुख, शाखासंघटिका, युवासेना शाखासंघटक यांची नावे व दूरध्वनी क्रमांक यांची माहिती गोळा करून अद्याप ज्या गावांमध्ये शिवसेनेची शाखा नाही, तिथे शाखा सुरू केली जात आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या प्रत्येक भागात बैठका घेऊन त्या अनुषंगाने स्वबळ निर्माण करण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. यानुसार जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत असून अनेक कार्यकर्ते सदर अभियानाशी जोडले जात आहेत. या दरम्यान प्रकर्षाने जाणवले की प्रत्येक गावागावांत, घराघरांत शिवसैनिक आहेत आणि जनतेच्या मनात जे शिवसेनेचे स्थान आहे, ते देखील या अभियानातून स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा यातून मिळत आहे.

शिरूर तालुक्‍यात सुरू करण्यात आलेल्या या शिवसंपर्क अभियान दौऱ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके यांच्यासह शिरूर तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार, जिल्हा समन्वयक मच्छिद्र गदादे, जिल्हा संघटक संजय देशमुख, जिल्हा सल्लागार अनिल काशिद, उपजिल्हा प्रमुख पोपटराव शेलार, राज्य अल्पसंख्याक महिला अध्यक्षा रेशमा पठाण, शिरूर तालुका महिला संघटक चेतना ढमढेरे, तालुका समन्वयक सुमन वाळुंज, विधानसभा संघटक विरेंद्र शेलार, उपतालुका प्रमुख संतोष भोंडवे, उपतालुका प्रमुख रोहिदास शिवले, उपतालुका प्रमुख अनिल पवार, तालुका सल्लागार संतोष काळे, विभाग प्रमुख आनंदा ढोरजकर, उपविभाग प्रमुख भीमराव कुदळे, आबासाहेब काळे, संतोष पवळे, गिरीश कोरेकर, वैभव कोकडे, दिपक कोकरे आदी सहभागी झाले आहेत.

त्याचबरोबर न्हावरा येथे झालेल्या कार्यक्रमास रेशमा पठाण, सुमन वाळुंज, संतोष काळे, अनिल पवार, गिरीश कोरेकर, आबासाहेब काळे, आनंदा ढोरजकर, वैभव कोकडे, रतनकांत खळदकर, गणेश फराटे, दादासो ढवळे, भाऊसाहेब शेलार, संपत फराटे, धनंजय ढवळे, सचिन परभाने, अविनाश ढवळे, धनंजय शेलार, जितेंद्र परभाने, मनोहर ढवळे, संदीप जगदाळे, संतोष परभाने, निलेश परभाने, संजय गांधी, सोमनाथ शेलार, सचिन शेलार, वडगांव रासाईचे सरपंच काकासाहेब खळदकर, रावसाहेब परभाने, ठाकसेन ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच रांजणगाव सांडस येथे झालेल्या कार्यक्रमाला लालासो वाघचौरे, समीर निंबाळकर, निरंजन रणदिवे, सरपंच उत्तम लोखंडे, सगन नारनोर, गजानन लोखंडे, शिवराज रणदिवे, वाल्मीक आण्णा रणदिवे, संदीप रणदिवे, रामकृष्ण रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर कटके यांनी बोलताना, “जनतेला आधार द्या, कारण ‘पोस्ट कोविड’ हे आर्थिक परिस्थितीवर भयानक आघात करणारे संकट आहे. एकीकडे सगळीकडून आर्थिक ओघ मंदावत आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिक हे अस्वस्थ झाले आहेत. या परस्थितीमुळे अनेकांचे रोजगार जात आहेत, कोरोनाच्या संकटात जगायचे कसे असा प्रश्‍न नागरिकांना सतावत असून यातूनही अर्थचक्र फिरवण्यासाठी जो-तो अतोनात प्रयत्न करीत आहे, अशावेळी आपल्याला नुसते राजकारण करून चालणार नाही, तर जनतेला आधार देण्याची गरज आहे. कृषी, उद्योग, रोजगार या क्षेत्रांत जे-जे करता येईल, ते करायला हवे,” असे मत त्यांनी मांडले.

Leave a comment

0.0/5