Skip to content Skip to footer

यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार : संजय राऊत

Delhi: कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. परंतु आता कोरोनाचं संकट ओसरु लागलं आहे. मुंबईला तिसऱ्या लाटेटा कसलाही धोका नाही, असं कालचमुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यासंबंधी हालचाली वाढल्या आहेत.

कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचं नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असं सांगत शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

 

Leave a comment

0.0/5