राज्यसरकारची नवरात्रोत्सवाची नियमावली जाहीर..अशी असेल नियमावली

Mumbai: राज्य सरकारने नवरात्र उत्सवाची नियमावली जाहीर केली आहे.यंदाही कोरोनामुळे नवरात्र उत्सव अगदी साध्या पद्धतीने होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना :-

– “ब्रेक द चेन” अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

– सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

– कोरोना महामारीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण आहे, त्या धोरणांशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत.

– यावर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा.

– सार्वजनिक मंडळांकरिता देवीच्या मूर्तीची उंची ही ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फुटाच्या मर्यादेत असावी.

– मूर्तीचे विसर्जन घरच्या घरीच करावे, तसे शक्य नसल्यास विसर्जनस्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

– गर्दी आकर्षित करणाऱ्या जाहिराती न लावता आरोग्यविषयक व सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी.

– “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत जनजागृती करावी.

– गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता आरोग्यविषयक उपक्रम व शिबिरे आयोजित करावीत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here