Skip to content Skip to footer

मराठा आरक्षण बाबत सर्वात मोठी बातमी!

मुंबई | मराठा आरक्षण चा (Maratha Reservation) प्रश्न सध्या पेटला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. मात्र तरीही सरकारने अद्यार कोणताही निर्णय घेतला नाही. अशात मराठा आरक्षण बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

समितीकडे उपलब्ध असलेल्या डेटानुसार सरकार तत्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करणार आहे. सध्या समितीकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती समोर आलीये.

Leave a comment

0.0/5