Skip to content Skip to footer

शेअर बाजारा तील पडझड सुरूच

इन्फोसिसमधील नाट्यमय घडामोडी आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा कायम ठेवल्याने शेअर बाजारा तील पडझड सोमवारी (ता.२१) कायम राहिली. दिवसअखेर सेन्सेक्‍स २६६ अंशांच्या घसरणीसह ३१ हजार २५८.८५ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ८३.०५ अंशांची घसरणीसह ९ हजार ७५४ अंशांवर बंद झाला.

समभागांच्या पुनर्खरेदीला सुरवात करणाऱ्या इन्फोसिसला शेअरमधील घसरण मात्र थांबवता आली नाही. सीईओ विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर इन्फोसिसच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. आज कंपनीच्या शेअरमध्ये ५.४० टक्‍क्‍याची घट झाली. तो ४९.६० रुपयांच्या घसरणीसह ८७३.५० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. बांधकाम, ऊर्जा निर्मिती, पायाभूत सेवा, वित्त सेवा पुरवठादार आणि बॅंका, दळणवळण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली.

अवश्य वाचा – एस्सार ऑईल कंपनीची ‘रॉसनेफ्ट’ला विक्री

राष्ट्रीय शेअर बाजारा च्या मंचावर सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. बुडीत कर्जांमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणी सापडलेल्या सार्वजनिक बॅंकांच्या शेअर्सची विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले. निफ्टी पीएसयू बॅंकेक्‍स, फार्मा, मेटल आणि आयटी निर्देशांकांत घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी मंचावर इन्फोसिस, आयटीसी, अंबुजा सिमेंट, एचयूएल, भारत पेट्रोलियम,टाटा स्टील, एसबीआय, रिलायन्स, पॉवर ग्रीड, अरबिंदो फार्मा, टाटा मोटर्स आदी शेअर्समध्ये घसरण झाली. ॲक्‍सिस बॅंक, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक आदी शेअर वधारले.

दोनशे कंपन्यांची नोंदणी रद्द होणार
बाँबे स्टॉक एक्‍सेंज (बीएसई) या आठवड्यात दोनशे कंपन्यांची शेअर बाजारातील नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. याचसोबत या कंपन्यांच्या प्रवर्तकांवरही १० वर्षांसाठीची ट्रेडिंग बंदी घालण्यात येणार आहे. या सर्व कंपन्यांना शेअर बाजाराच्या यादीतून वगळण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5