Skip to content Skip to footer

‘फोर्ब्स’मध्ये झळकल्या भारतीय वंशाच्या महिला

Jayashree Ullal and Neerja Sethiन्यूयॉर्क – स्वःकर्तृत्वाच्या बळावर आपली ओळख प्रस्थापित केलेल्या अमेरिकेतील श्रीमंत महिलांची यादी ‘फोर्ब्ज’ने प्रसिद्ध केली असून, त्यात दोन मूळ भारतीय वंशांच्या महिलांना स्थान मिळाले आहे. जयश्री उल्लाल आणि नीरजा सेठी अशी त्यांची नावे आहेत.

फोर्ब्सच्या ६० स्वःकर्तृत्ववान श्रीमंत महिलांच्या यादीत २१ वर्षीय टीव्ही स्टार व उद्योजिका कायली जेनर हिचाही समावेश आहे. एबीसी सप्लाय कंपनीच्या डायने हेंड्रिक्‍स या यादीत अव्वल स्थानी आहेत. त्या आच्छादने, खिडक्‍या यांच्या मोठ्या वितरक म्हणून परिचित आहेत. मूळ भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाल यांनी १.३ अब्ज डॉलरच्या (८८०० कोटी) मालमत्तेसह या यादीत १८ वे स्थान प्राप्त केले आहे; तर नीरजा सेठी २१ व्या स्थानावर आहेत. त्यांची मालमत्ता १ अब्ज डॉलर (६८०० कोटी) इतकी आहे.

सर्व ६० महिलांची एकत्रित निव्वळ मालमत्ता ७१ अब्ज डॉलर असून, त्यातील २४ महिला अब्जाधीश असल्याची माहिती फोर्ब्सने दिली आहे.

Leave a comment

0.0/5