Skip to content Skip to footer

नवीन चप्पल आणली नाही म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये ‘रुममेट’ची हत्या

रुममध्ये राहणाऱ्या सहकाऱ्याने नवीन चप्पल आणली नाही, या किरकोळ कारणावरुन एकाने त्याची हत्या केल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. २४ सप्टेंबरला एका कामगाराचा मृतदेह चिंचवडच्या केशवनगर येथून मिळाला होता. संशयित आरोपीने मयत इसमाला नवीन चप्पल आणण्यासाठी सांगितले होते. त्याने चप्पल आणली नसल्याने आरोपीने डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. चिंचवड पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरला चिंचवडच्या केशवनगर येथील खुशबू हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका इसमाचा मृतदेह आढळला होता.

https://maharashtrabulletin.com/electricity-complaint-on-toll-free-number/

ती हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले. राम सनेही जगदीश रावत असं हत्या झालेल्या इसमाच नाव होतं. हत्येच्या १५ दिवस अगोदरपासून मयत राम सनेही जगदीश रावत आणि दत्ता मच्छीवाला हे सोबत राहत होते. दत्ता मच्छीवाला याने मयत राम सनेही जगदीश रावत याला नवीन चप्पल आणण्यासाठी सांगितले होते. परंतु त्याने चप्पल आणली नाही म्हणून आरोपी आणि मयत यांच्यात वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर दोघांच्यात हाणामारी झाली. यातूनच दत्ता याने राम सनेहीच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी दोघही नशेत होते.

आपल्या हातून हत्या झाल्याचे लक्षात येताच आरोपीनं मुंबईला पळ काढला. त्यानंतर त्याने थेट उत्तर प्रदेश गाठलं. पोलीस निरीक्षक व्ही के कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या टीमनं आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली. त्याला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5