मुंबई :‘फोर्ब्स’ मासिकाने जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या पहिल्या शंभर सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीत अभिनेता अक्षय कुमारने 76 वं स्थान मिळवलं, तर सलमान खान 82 व्या स्थानी आहे.
अभिनेता शाहरुख खान आणि आमिर खान फोर्ब्सच्या ‘टॉप 100’ च्या यादीत स्थान मिळवू शकले नाहीत. फोर्ब्सच्या यादीनुसार, अक्षय कुमारने यावर्षी 40.5 दशलक्ष डॉलरची कमाई केली.
‘सामाजिक विषयांवर सिनेमे करुन एवढी कमाई करणारा अक्षय कुमार हा मोजक्या बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे. यामध्ये ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’ सारखे सिनेमे त्याने केले आहेत,’ असं फोर्ब्सने म्हटलं आहे.
या यादीत 12 स्टार्स असे आहेत, ज्यांची कमाई 100 मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. गेल्या 20 वर्षांपासून फोर्ब्स ही यादी जाहीर करत आहे. तब्बल 12 सेलिब्रिटींनी 100 मिलियन डॉलरपेक्षा जास्त कमाई करण्याची ही 20 वर्षांच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे.
via अधिक माहितीसाठी