Skip to content Skip to footer

1962 ला सुरु त्यांनी केलं, 1967 ला आपण संपवलं… ‘पलटन’ चा ट्रेलर रिलीज

मुंबई : अर्जुन रामपालला पहिल्यांदाच भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या रुपात पाहता येणार आहे. अर्जुन रामपाल भारत-चीन युद्धावर आधारित ‘पलटन’ सिनेमात दिसणार आहे.  अर्जुनचं रिअल लाईफमध्येही भारतीय सैन्यासोबत जुनं नातं आहे. त्याचे आजोबा ब्रिगेडियर गुरदयाल सिंह यांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आर्मीसाठी आर्टिलरी गन डिजाईन केली होती. दरम्यान अर्जुनच्या वडिलांचा या क्षेत्राशी फारसा संबंध नाही.

अर्जुन रामपाल गुर्जर समाजातील असून त्याचं शिक्षण नाशिकमध्ये झालेलं आहे. लग्नानंतर काही दिवसातच त्याचे आई-वडील वेगळे झाले. त्यानंतर तो आपल्या आईसोबतच मोठा झाला. तो त्याच शाळेत शिकला, जिथे त्याची आई शिक्षिका म्हणून कार्यरत होती.

अर्जुन रामपाल भारत-चीन युद्धावर आधारित पलटन सिनेमात दिसणार आहे. जे. पी. दत्ता दिग्दर्शक म्हणून 12 वर्षांनंतर पुनरागमन करत आहेत. उमराव जान हा त्यांचा अखेरचा सिनेमा होता.

पाहा ट्रेलर :

https://youtube.com/watch?v=4qspiginsaU

अर्जुनसोबतच या सिनेमात जॅकी श्रॉफ, सोनू सूद, गुरमीत चौधरी, हर्षवर्धन राणे, सिद्धार्थ कपूर यांसारखे अभिनेते असतील. या जवानांना धैर्य देणाऱ्या त्यांच्या पत्नींच्या भूमिकेत ईशा गुप्ता, सोनल चौहाण, दीपिका कक्कड आणि मोनिका गिल दिसणार आहेत.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5