Skip to content Skip to footer

दीपिका आणि रणवीर च्या लग्नाचा मुहूर्त ठरला!; ‘इथे’ होईल सोहळा

मुंबई – बी-टाउनची सगळ्यात लाडकी जोडी दीपिका आणि रणवीर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या हॉट कपलच्या लग्नाच्या चर्चा गेल्या वर्षापासूनच सुरु झाल्या होत्या. आता मात्र या विवाहसोहळ्याची तारीख आणि जागा निश्चित करण्यात आली आहे.

आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलण्याचं टाळलं असलं तरी बी-टाउनच्या प्रत्येक कार्यक्रमाला दीपिका-रणवीर जोडीनं हजेरी लावायचे. 20 नोव्हेंबर 2018 ला दीपिका-रणवीर लग्नाचा बार उडवतील. पाच वर्षापासून ही जोडी रिलेशनशीपमध्ये आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर दीपिका-रणवीर कडे चाहते टक लावून होते. ही प्रतिक्षा आता संपली आहे.

 

काही महिन्यांपुर्वी वांद्रे येथे दीपिका तिच्या आईसोबत ज्वेलरी खरेदी करताना दिसली होती. त्यामुळे लग्नाच्या खरेदीला सुरवात झाल्याचीही चर्चा ऐकायला मिळाली.

अनुष्का-विराट प्रमाणेच हे दीपिका-रणवीर डेस्टिनेशन वेडींग करणार आहे आणि त्यांनी इटली हेच ठिकाण लग्नासाठी निवडलं आहे. इटली येथे या जोडीचं आवडतं ठिकाण मिलानमधील लेक कोमो किनाऱ्याजवळील व्हिलामध्ये दोघं लगीनगाठ बांधतील. लेक कोमो हे इटलीतील सर्वात प्रसिद्ध टुरिस्ट डेस्टिनेशन पेकी एक ठिकाण आहे. ऐल्पस पर्वतात वसलेलं हे ठिकाण आहे. रंगाबेरंगी घरांचे गाव आणि गॉथिक आर्किटेक्चर या ठिकाणाचे सौंदर्य अजुन वाढवते.

दीपिका आणि रणवीर च्या लग्नाचा मुहूर्त ठरला!; 'इथे' होईल सोहळा | Deepika Padukone And Ranveer Singhs Wedding Date Is Confirmed | Deepika Padukone And Ranveer Singhs Wedding Date Is Confirmed

या लग्नाचे आमंत्रण मात्र अगदी मोजके म्हणजे 30 लोकांनाच देण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांत बॉलिवूड आणि इतर मंडळींसाठी मुंबईत ग्रँड रिसेप्शन असेल असंही म्हटलं जात आहे.

 

Leave a comment

0.0/5