Skip to content Skip to footer

लहान मुलांना इंटरनेट पासून दूर ठेवण्यासाठी १२ ते ६ इंटरनेट सेवा बंद

लहान मुलं मोठ्या प्रमाणात इंटरनेट च्या आहारी गेले आहे. ही समस्या जगभरात सारखीच आहे. त्यामुळे लहान मुलांना इंटरनेटच्या व्यसनापासून किमान काही तास दूर ठेवण्यासाठी सहा तास इंटरनेट बंद ठेवण्याचा विचार मलेशिया करत आहे.

या देशांतील १७ वर्षांखालील अनेक मुलं इंटरनेटच्या आहारी गेले आहे, मुलं बराच वेळ इंटरनेटवर व्हिडिओ गेम्स खेळण्यात आपला वेळ वाया घालवतात असं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे रात्री १२ वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत देशांत पूर्णपणे इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा विचार मलेशिया करत आहेत. सोशल मीडियावर मुलं रात्री सर्वाधिक सक्रीय असतात अशी माहिती मलेशियाचे आरोग्य मंत्री ली बून ची यांनी दिली.

त्यामुळे जपानच्या धर्तीवर देशात सहा तास इंटरनेटबंदी लागू करण्याचा विचार या देशाचा आहे. मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे असं आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे. १३ ते १७ वर्ष वयोगटातील जवळपास ३५ % मुलं इंटरनेटच्या व्यसनाला बळी पडले आहेत हा आकडा वाढण्याआधीच त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज मलेशियाला वाटत आहे. इंटरनेटबंदीच्या विचारावर सगळ्यांचं मत लक्षात घेऊन मगच निर्णय घेण्यात येईल असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

याआधी अल्जेरिया देशानं परीक्षेदरम्यान पूर्णपणे इंटरनेट बंदी केली होती. ७ लाख विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी इंटरनेट सेवा परीक्षेच्या काळात पूर्णपणे बंद करण्यात आली होती. २०१६ मध्ये येथे परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात कॉपी करण्यात आली होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

Leave a comment

0.0/5