Skip to content Skip to footer

तनुश्रीने पैसे देऊन रेसलींग स्पर्धेत मला मारले – राखी सावंत

नुकतीच हरियाणातील झालेल्या रेसलींग स्पर्धेत अभिनेत्री राखी सावंत ने उपस्थिती दर्शविली होती. पण राखीला या खेळात दुखापत झाल्याने तिला थेट रुग्णालय गाठावे लागले. राखीने या प्रकरणानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रेसलिंगच्या बिग फाईटचे आयोजन पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली करण्यात आले होते. राखीने या स्पर्धेत डान्स करण्यास सुरुवात केली असता तिला त्या महिला कुस्तीपटूने खाली आपटले. तिच्या कमरेला यामुळे जबर मार लागला. तिला त्यामुळे बसणे सुद्धा कठिण झाले आहे.

याबाबत राखी सावंत म्हणाली कि, आपल्यासोबत धोखा झाला असून मी त्याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी नाहीतर डान्स करण्यासाठी गेली होती. यादरम्यान, माझा विश्वासघात केला. मला माहित नाही त्या महिलेने माझ्यासोबत असे का केले. कदाचित मीटूच्या लोकांनी किंवा तनुश्रीने मला मारण्याचे पैसे दिले असतील. जे काही आहे ते रेसलरच सांगू शकते.

डान्स करता-करता तिने मला कधी उचलले आणि कधी खाली आपटले हे मला कळाले नाही. सध्या माझी प्रकृती चांगली होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहे. राखीने या प्रकरणानंतर रेसलरसोबत बदला घेण्याची भावना व्यक्त केली. तसेच रेसलर गीता आणि बबीता फोगाट यांनी माझा बदला रेसलरशी घ्यावा असे आवाहन ही राखीने त्यांना केले आहे.

Leave a comment

0.0/5