Skip to content Skip to footer

बीडच्या 85 अनाथ मुलांना सिध्दार्थ जाधवचा मदतीचा हात

आपल्या आसपासच्या लोकांच्या चेहऱ्यावर नेहमीच महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिध्दार्थ जाधव हसू फुलवत असतो. पण एक सामाजिक भान असलेला संवेदनशील माणूसही या मस्तीखोर आणि मनमौजी अभिनेत्यामागे दडलेला आहे, हे त्याने दाखवून दिले आहे. सिध्दार्थने नुकत्याच एका कार्यक्रमात बी़डच्या सहारा अनाथालयाच्या निराधार मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलवण्यासाठी धनराशी भेट दिली आहे.

सहारा अनाथलायाची 14 वर्षांपूर्वी स्थापना करून अनेक उपेक्षित, आणि वंचित मुलांना घर मिळवून देणाऱ्या संतोष गर्जेचा त्याच्या सामाजिक कामासाठी अभिनेता सिध्दार्थ जाधवच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सत्कार करण्यात आला. संतोषने तेव्हा मनमोकळे करताना आपली आत्मकथा आणि निराश्रीत मुलांची व्यथा सांगताच सर्वांसमक्ष सिध्दार्थने देणगी देण्याचे जाहीर केले.

सिध्दार्थ जाधव म्हणतो, मला बीडच्या पाटसरा यादुर्गम खेड्यातल्या गरीब उसतोडणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या संतोषचा अभिमान आहे. तो वयाच्या 19 व्या वर्षापासून अनाथ आणि उपेक्षित मुलांसाठी काम करतो आहे. 85 निराधार मुले त्याच्या सहारा अनाथालयात आहेत. या मुलांसाठी मी खारीचा वाटा उचलला. एवढेच म्हणेन, जी मी रक्कम दिली, ती संतोषच्या कार्यापुढे फार छोटी आहे.

Leave a comment

0.0/5