अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी करण जोहरच्या ‘धडक’ चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात दोघ्याची जबरदस्त केमिस्ट्री पाहिला मिळाली. त्यानंतर अशा वावड्या उठल्याकी हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्यात मैत्री पलीकडचे नाते असल्याचे बोलले जात आहे. कारण सध्या या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवी कपूरने या फोटोत एक लाल रंगाचा स्वेटर घातला आहे. ईशान खट्टर याने आपल्या सोशल अकाउंट वरुन असाच एक लाल रंगाचा स्वेटर घातलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर यांच्या रिलेशनशिप बद्दल जोरदार चर्चा सुरु आहे.
https://www.instagram.com/p/Btlet2VA7tO/?utm_source=ig_web_copy_link
जान्हवीचा स्वेटर घातलेला हा फोटो जिममधून बाहेर येतानाचा आहे. तर काही दिवसांपूर्वी ईशानने तसाच सेम स्वेटर घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता त्यांचे चाहते दोघांचा फोटो एकत्र मर्ज करुन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमुळे जान्हवी आणि ईशान रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.