Skip to content Skip to footer

उन्नति सोशल फाऊंडेशन मार्फत मोफत “विठाई ” वाचनालयाची सुरुवात

पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशन मार्फत पिंपळे सौदागर येथील वाचकांसाठी ” विठाई ”  मोफत वाचनालयाची स्थापना केली. यामध्ये मराठी , हिंदी व इंग्रजी अशी मिळून तब्बल १५०० हुन अधिक पुस्तके उपलब्ध केली आहेत . याप्रसंगी वाचनालयाचे उदघाटन पिंपरी चिंचवड शहराचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले .

माणूस हा पुस्तकांमधूनच घडतो, त्यामुळे पुस्तकेच काळाची गरज आहे, असे वक्तव्य आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.  तसेच सुभाष पवार यांनी वाचनालयामध्ये असलेली पुस्तके व त्यांचे महत्व यावर मार्गदर्शन केले . तर मार्गदर्शन पर व्याख्यान प्रदीप कदम यांनी केले .
यावेळी पिंपळे सौदागर प्रभागाचे नगरसेवक शत्रूघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, उन्नति सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, डॉ. गिरीश प्रभुणे, यशदा रिऍलिटी ग्रुप चे चेअरमन वसंत काटे, ग्रॅव्हिटी लॅन्डमार्क्स चे चेअरमन राजू भिसे, विजय भिसे, आनंद हास्य क्लब चे सर्व सभासद , ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन चे सर्व सभासद, नवचैतन्य हास्य क्लब चे सर्व सभासद, पिंपळे सौदागर येथील सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्तिथ होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोत्रे -पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता नवचैतन्य हास्य क्लब चे सदस्य राजेंद्र पाटील यांनी आभार मानून केले.

Leave a comment

0.0/5