Skip to content Skip to footer

प्रभूदेवा-तमन्ना भाटियाच्या ‘खामोशी’चा ट्रेलर रिलीज

लवकरच स्क्रीन शेअर करताना दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया दिसणार आहेत. ही जोडी आगामी ‘खामोशी’ चित्रपटात एकत्र झळकणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे नव्या पोस्टरसोबतच आता ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे नवे पोस्टर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. प्रभूदेवाचे रौद्र रूप या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे, तर तमन्ना ही घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चक्री टॉलेटी यांनी केले आहे. हा चित्रपट ३१ मे रोजी रिलीज करण्यात येणार आहे.

Leave a comment

0.0/5