Skip to content Skip to footer

मणिरत्नमसाठी खलनायिका होणार ऐश्वर्या राय

‘फन्ने खान’ या चित्रपटाद्वारे आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. ऐश्वर्या या चित्रपटानंतर आता खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये सक्रीय झाली आहे. लवकरच दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटामध्ये आता ती झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भातील वृत्त मिडेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. ऐतिहासिक कादंबरी ‘पोन्नियिन’वर आधारित हा चित्रपट आहे. चोल साम्राज्यावर या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात येणार आहे. नंदिनी ही व्यक्तीरेखा यामध्ये ऐश्वर्या साकारणार असून पेरिया पझुवेत्तारय्यर यांची नंदिनी ही पत्नी होती. चोल साम्राज्याच्या चान्सलर आणि खजिनदार पदाची जबाबदारी तिने पार पाडली होती. चित्रपटाच्या चित्रीकरणाला या वर्षांच्या अखेरीस सुरुवात होणार आहे.

Leave a comment

0.0/5