Skip to content Skip to footer

वारजे येथे डिझेल, पेट्रोल वाहून नेणारा टँकर उलटला (व्हिडिओ)

 

वारजे माळवाडी येथे पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणारा टँकर उलटला. हा अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावर वारजे माळवाडी येथे घडला. या अपघातामुळे टँकरमधील तब्बल पाच हजार लिटर पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर सांडले. अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार टँकरमध्ये रॉकेल असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र नंतर हा टँकर डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक करणारा होता हे स्पष्ट झाले.

आज, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जात असताना हा टँकर उलटला. टँकर उलटताच डिझेल आणि पेट्रोलचे पाट रस्त्यावर वाहू लागले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पेट्रोल, डिझेल ज्या भागात पडले होते. तिथे वाळू टाकून पुढे जाण्याचा प्रवाह कमी केला. मात्र पर्यंत टँकरमधील अंदाजे पाच हजार लिटर डिझेल आणि पेट्रोल वाहून गेले.

या अपघातात टँकर चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल कात्रज येथील पंपावर नेले जात होते.

Leave a comment

0.0/5