Skip to content Skip to footer

सुरतमध्ये चेहऱ्यावर केक फासण्यास बंदी

वाढदिवस साजरा करताना तोंडावर केक थापायची पद्धत सध्या आपल्याकडे रूढ झाली आहे. खायचा कमी आणि तोंडावर थापायच्या या पद्धतीमुळे मात्र तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. गुजरात राज्यातील सूरतमध्ये आता सार्वजनिक ठिकाणांवर वाढदिवस साजरा करताना एखाद्याच्या चेहऱ्यावर केक लावणे, थापणे किंवा फोम सारखे केमिकल चेहऱ्यावर लावल्यास तुरुंगाची हवा खाली लागणार आहे. याबाबत पोलिसांनी याप्रकरणी निर्देश जारी केले आहेत.

वाढदिवस साजरा करताना लोक सार्वजनिक स्थळांवर हिंसक होताना दिसून आल्याने हे निर्देश देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर कलम 188 अन्वये स्पेशल ब्रॅंचचे पोलीस अधिकारी पीएल चौधरी यांनी सार्वजनिक अधिसूचना काढली. यात त्यांनी अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात येईल, असे म्हटले आहे. पोलीस आयुक्‍त सतीश शर्मा यांच्या मते, काही घटनांमध्ये वाढदिवस साजरा करताना लोकांना दुखापती झाल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5