Skip to content Skip to footer

नेहा कक्कडला रडवणा-या या व्यक्तिची होणार का ‘बिग बॉस 13’मध्ये एन्ट्री?

बिग बॉस’चे १३ वे सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. साहजिकच या वादग्रस्त शोमध्ये कोण जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. तूर्तास बिग बॉसच्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीतील एकापाठोपाठ एक नाव समोर येत आहेत. यातील एक नाव आहे ते हिमांश कोहलीयाचे. आता हा हिमांश कोण हे विचारू नका. तोच तो सिंगर गायिका नेहा कक्कड हिचा एक्स बॉयफ्रेन्ड.

हिमांशने ‘यारिया’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर जीना इसी का नाम है, स्वीटी वेड्स एनआरआय, रांची डायरीज, दिल जो न कह सका, अशा चित्रपटात तो झळकला. पण हे चित्रपट त्याचे करिअर सावरू शकले नाहीत.   चित्रपटांतील त्याच्या करिअरला ओहोटी लागली आणि चित्रपटांपेक्षा तो नेहासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला.अनेक वर्षे तो नेहासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण गतवर्षी त्याच्या ब्रेकअपची बातमी आली आणि सगळ्यांना धक्का बसला. हिमांशसोबत ब्रेकअप झाल्याचे खुद्द नेहाने जाहिर केले होते. या ब्रेकअपमधून सावरणे नेहाला बरेच कठीण गेले होते.

खरे तर नेहाचे ब्रेकअप झाले, हे   कुणाला कळण्याचे कारण नव्हते. पण बयाने स्वत:च सोशल मीडियावर या ब्रेकअपचा नको इतका गवगवा केला होता.  इतके कमी की काय म्हणून अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही एक्स बॉयफ्रेन्डच्या आठवणीने ढसाढसा रडली होती. याचा पुढे तिला पश्चातापही झाला होता.मी अतिशय संवेदनशील व्यक्ति आहे. माझ्या खासगी आयुष्यात गेल्या काही महिन्यांत जे काही झाले ते सगळेच दु:खद होते. ते मी बदलू शकत नाही. पण एका गोष्टीचा मात्र मला राहून राहून पश्चाताप होतोय. ती म्हणजे, माझे खासगी आयुष्य मी सार्वजनिक केले,’असे ती म्हणाली होती.

Leave a comment

0.0/5