Skip to content Skip to footer

चित्रपट आपटले तरी ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींच्या संपत्तीचा आकडा पहा.!

आमिषा पटेल- सन २००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ सारखा सुपरडुपर हिट सिनेमा देणारी अभिनेत्री अमिषा पटेलने  पहिल्याच चित्रपटाने  तरुणांना अक्षरश: वेड लावले होते. या सिनेमाने अभिनेता हृतिक रोशनला एका रात्रीत स्टार बनवले, तर अमिषा पटेललासुद्धा बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त करुन दिली.  पुढच्याच वर्षी ‘गदर एक पे्रमकथा’ हा तिचा दुसरा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमाही सुपरडूपर हिट ठरला. या सिनेमातील चुलबुली शकीनाच्या भूमिकेमुळे अमिषाच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. मात्र या सिनेमानंतर आमिषाला फारसे यश मिळाले नाही. आता आमिषा सिनेमात तर सोडा कोणत्या जाहीरातीमध्येही झळकत नाही. तरीही तिची संपत्ती   ३५ दशलक्ष डॉलरहून अधिक आहे.

अमृता राव- अमृता रावने मोजक्याच पण लक्षात राहतील अशा भूमिका साकारल्या असल्या तरी तिलाही बॉलिवूडमध्ये पाहिजे तसे यश मिळाले नाही. विवाह, मै हुँ ना, इश्क -विश्क, मस्ती आदी सिनेमात तिने साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहेत.बॉलिवूडसह अमृताने दाक्षिणात्य सिनेमातही काम केले आहे. अमृताकडे जवळपास २० दशलक्ष डॉलरहून जास्त संपत्ती असल्याचे बोलले जाते.

मल्लिका शेरावत: आपल्या हॉट भूमिकांमुळे रसिकांचे लक्ष मल्लिकाने वेधले. मल्लिकाच्या वाट्याला आता बॉलिवूड सिनेमाच्या ऑफर्स मिळत नसल्या तरी काही हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. मल्लिका श्रीमंत अभिनेत्रींच्या यादी 8 व्या क्रमांकावर असून तिची एकूण संपत्ती ही   67 कोटींहून अधिक आहे.

Leave a comment

0.0/5