Skip to content Skip to footer

विनयभंग प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दिकीला न्यायालयाकडून दिलासा

“नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबीयांकडून शारीरिक, मानसिक छळ”; पत्नीचे गंभीर आरोप

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचं आयुष्य गेल्या काही दिवसांमध्ये ढवळून निघालं आहे. त्याची पत्नी आलिया सिद्दिकी हिने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. शिवाय पोलीस तक्रार करत नवाजला अटक करावी अशीही मागणी तिने केली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने नवाजला दिलासा देत त्याच्या अटकेला स्थगिती दिली आहे.

आलियाने २७ जुलै रोजी मुंबईतील एका पोलीस ठाण्यामध्ये नवाजुद्दीन सिद्धीकी आणि त्याच्या कुटुबांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. लक्षवेधी बाब म्हणजे तिने केवळ मुंबईतच नाही तर मुजफ्फरनगर येथील बुढाना येथे देखील तक्रार केली. या तक्रारींमार्फत तिने नवाजवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहेत. सध्या हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरु आहे. पोलीसांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान कोर्टाने नवाज आणि त्याच्या कुटुंबियांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.

नवाजवर आरोप करताना काय म्हणाली आलिया?

“लग्नाच्या वर्षभरानंतर मला त्रास देणं सुरू झालं होतं. पण मी हे कोणालाच न सांगता सर्व सहन केलं” हे सांगताना नवाजुद्दीनच्या भावाने तिच्यावर हात उचलल्याचा खुलासाही आलियाने केला. नवाजुद्दीनच्या पहिल्या पत्नीनेही याच कारणामुळे घटस्फोट दिल्याचं आलियाने सांगितलं. “मी कधीच काही करू शकत नाही, अशी वागणूक मला नवाजुद्दीनने मला दिली. तो मला इतर लोकांसमोर बोलूही द्यायचा नाही. त्याने माझ्यावर कधी हात उचलला नाही. पण त्याचं ओरडणं आणि त्याचे वाद माझ्या सहनशक्तीपलीकडे गेले आहेत. त्याच्या कुटुंबीयांनीही माझं मानसिक व शारीरिक शोषण केलं. त्याच्या भावाने माझ्यावर हात उगारला. मुंबईत त्याची आई, त्याचा भाऊ आणि बहिणी आमच्यासोबतच राहायचे. गेल्या काही वर्षांपासून मी खूप काही सहन करतेय. त्याची पहिली पत्नीसुद्धा याच कारणामुळे सोडून गेली होती. या घरात आधीच चार घटस्फोट झाले आहेत. त्यामुळे घटस्फोट हा त्यांच्या कुटुंबाचा एक भागच झाला आहे. हा पाचवा घटस्फोट असेल”, असे आरोप आलियाने केले.

Leave a comment

0.0/5