इब्राहिम बॉलिवूडसाठी सज्ज ; सैफ अली खानची घोषणा
संपूर्ण परिवाराला बॉलिवूड मध्ये स्थान देण्यासाठी सैफ खानचे प्रयत्न आहेत. त्याची आई शर्मिला टागोर या ९० च्या दशकापासून टॉपच्या अभिनेत्री आहेत. त्यांच्यानंतर स्वतः सैफने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. तसेच त्याची पहिली पत्नी अमृता सिंह आणि त्याची पत्नी करीना कपूर खान या देखील नामवंत सेलिब्रिटी आहेत. या सर्वांनंतर त्याची मुलगी सारा अली खान, त्याची बहीण सोहा अली खान आणि तिचा नवरा कुणाल खेमु हे सुद्धा बॉलिवूडच्या दुनियेत चांगली ओळख असलेले कलाकार आहेत.
परंतु या सगळ्यांपेक्षा त्याचा व अमृता सिंहचा मुलगा इब्राहिम अली खान देखील बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज असल्याचे सैफने म्हटले आहे. सैफने याबद्दल पूर्वी देखील त्याचा मानस बोलून दाखवला होता. इब्राहिमने आधी त्याचे उच्च शिक्षण पूर्ण करावं आणि मग बॉलिवूड मध्ये आपले पाय रोवावे, असे सैफने म्हटले होते. एका कार्यक्रमात बोलताना सैफ म्हणाला की, ‘ फिल्म इंडस्ट्री काम करण्यासाठी चांगली जहा आहे. जेव्हा मी १७-१८ वर्षांचा होतो तेव्हा मला काहीच येत नव्हतं पण नंतर अभिनयाने माझं आयुष्य सावरलं’.